जळगाव मिरर | १० फेब्रुवारी २०२५
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश आले होते तर महाविकास आघाडीला धक्का तर मनसेचा सुपडा साफ झाला होता मात्र आता आगामी स्थानिक निवडणूक लक्षात घेता मनसेचे नेते राज ठाकरे पुन्हा एकदा जोरदार तयारीला लागले असतांना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट ॲंड गाईड हाॅलमधील शिवाजी पार्कमध्ये परीक्षा पे चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत.
त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच फडणवीस राज ठाकरेंची भेट घेत आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.