जळगाव मिरर | १० फेब्रुवारी २०२५
राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात सोमवारी पहाटे भीषण अपघात घडला आहे. ट्रक, मिनी बस आणि दुचाकीचा झालेल्या या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तब्बल 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त मिनी बस ही पंढरपूर-तुळजापूर देवदर्शनाला जात होती. त्यादरम्यान मोहोळ तालुक्यातील कोळेवाडी जवळील सोलापूर-पुणे महामार्गावर कंटेनर मिनीबस दुचाकीचा भीषण अपघात झाला.
सविस्तर वृत्त असे कि, सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रक आणि दुचाकीची धडक झाल्यानंतर ट्रकने विरुद्ध बाजूला जाऊन मिनी बसला धडक दिली. ट्रकने मिनी बसला धडक दिल्यामुळे मिनी बस झाली पलटी झाली. पंढरपूर तुळजापूर देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या मिनी बसला अपघात झाल्यामुळे बस चालकासह 3 जण ठार झाले. यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 15 जण जखमी झाले या घटनेची माहिती होताच, स्थानिकांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात सर्वात आधी कंटेनरला धडकलेला दुचाकीस्वार दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. कंटेनर मिनी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर सोलापूर-पुणे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पलटी झालेली मिनी बस क्रेनच्या साह्याने बाजूला केली. याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक पोलिसांकडून केला जात आहे.