जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२५
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक १९ रोजी वासुमित्रा फाउंडेशनतर्फे स्वामी समर्थ चौक रामेश्वर कॉलनी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिरात 50 युवकांनी रक्तदान केले. शिबिरास इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांचे सहकार्य लाभले
रक्तदान शिबिराची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली त्याप्रसंगी माजी नगरसेवक गणेश भाऊ सोनवणे, वासुमित्रा फाउंडेशनचे अध्यक्ष भुषण भाऊ सोनवणे, उद्योजक यशवंत पाटील, विजयरथ फाउंडेशनचे अमोल पाटील, जयेश पाटील, श्रीकांत शोले, संदीप येवले, शशिकांत पाटील,विनोद ढमाले, राहुल देशमुख, प्रशांत सोनवणे, देवेंद्र मराठे,बबलू सपकाळे ,मनोज निंबाळकर ,केतन सोनवणे, योगेश सोनवणे , दीपक मांडोळे,मयूर पाटील ,आकाश हिवाळे, प्रवीण जाधव, धीरज केने, मोहन यादव, मनोज राठोड, गजानन रायते, गोलू सोनार, भूषण जोशी, गौरव सपकाळे, प्रतीक सोनवणे, रमेश केने, कृष्णा सपके, मिलिंद सोनवणे, भगवान भालेराव आदी उपस्थित होते.