जळगाव मिरर | २१ फेब्रुवारी २०२५
माझ्या मुलाचा यात काहीही संबंध नसल्याचे म्हटल्याचा राग आल्याने चौघांनी राकेश गणपत कंजरभाट (वय ४७, रा. कंजरवाडा हौसिंग सोसायटी) यांना बेदम मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. १८ रोजी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास शहरातील चेतनदास हॉस्पिटलजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कंजरवाडा हौसिंग सोसायटी येथे रामेश गणपत कंजरभाट हे वास्तव्यास आहे. दि. १८ रोजी सायंकाळी ते चेतनदार हॉस्पिटलजवळ संशयित रमेश सिद्धराम भाट, रोहीत भाट, राज भाट, राहुल भाट सर्व रा. कंजरवाडा यांनी त्यांना थांबवले. यावेळी संशयितांनी रामेश कंजरवाभाट यांना तुझा मुलगा इंन्टाग्रामवर आमची बदनामी करतो असे सांगितले.
त्यावर राकेश यांनी माझ्या मुलाचा याबाबत काहीही संबंध नाही असे सांगितले. त्याचा राग आल्याने चौघांनी राकेश कंजरभाट यांना बेदम मारहाण केली. यावेळी काही जण त्यांना सोडविण्यासाठी आले असता, त्यांना देखील मारहाण करुन शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी राकेश कंजरभाट यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ संजीव मोरे करीत आहे.