जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२५
शहरातील राजकमल चौकात भरधाव कारने प्रवाशी रिक्षाला समोरून जोरदार धडक दिल्याने दोन चुलतभाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शेख अन्सार शेख सईद (वय ४१) रा. मुजावर नगर, जामनेर हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. हमाल काम करून आपला उदरनिर्वाह करतात. जळगाव रेल्वे स्टेशन येथून ते अजिंठा चौकात जाण्यासाठी रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू ६६१३) ने शेख अन्सार हे आपल्या चुलत भावासोबत प्रवास करत होते. शहरातील राजकमल चौकातून जात असतांना समोरून येणारी कार क्रमांक (एमएच १४ ईएच ०९२५) ने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत शेख अन्सारी आणि त्यांचे चुलत भाऊ हे गंभीर जखमी झाले.