जळगाव मिरर | ३ मार्च २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना आता एक खळबळजनक घटना मुंबई येथील घाटकोपर येथून समोर येत आहे. एका बापाने दोन मुलांचे कसेबसे पालनपोषण सुरू असताना तिसरी मुलगी झाली, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाल्याच्या नैराश्यातून संजय बाबू कोकरे या बिगारी कामगाराने आपली चार महिन्यांची मुलगी श्रेया हिची गळा घोटून हत्या केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरच्या कामराजनगरमध्ये शैला तिचा पती संजय आणि दोन मुलांसोबत राहते. ती घरकाम करते. चार महिन्यांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला होता. महागाईमुळे मुलांचे पालनपोषण करणे शक्य नसल्याने त्याला तिसरे मूल नको होते. शुक्रवारी दुपारी शैला कामावर निघून गेली होती. चार महिन्यांची श्रेया पाळण्यात झोपली होती. काही वेळानंतर तिथे संजय आला आणि त्याने झोपेत असलेल्या श्रेयाची गळा आवळून हत्या केली. शैला कामावरून आल्यानंतर तिला ही बाब लक्षात येताच तिने श्रेयाला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिथे श्रेयाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात तिचा गळ आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आल होते. त्यामुळे पंतनगर पोलिसांनी हत्येच्च गुन्हा नोंदवून संजयला चौकशीसाठ ताब्यात घेतले होते. यावेळी मुलांच पालनपोषण करण्यास आपण असमध् होतो, त्यामुळे श्रेयाची हत्या केल्याचे संजयने सांगितले. या कबुलीनंतर त्याल पोलिसांनी अटक केली. त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.