जळगाव मिरर | ३ मार्च २०२५
प्रेमात कोण कधी धोका देणार यावर कुणीही सांगू शकत नाही आवडत्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतात. प्रेमात असलेले व्यक्ती रागाच्या भरात कोणतंही पाऊल उचलताना मागे पुढे पाहत नाही. असाच प्रकार एका प्रसिद्ध डान्सरने केला आहे. प्रसिद्ध डान्सरच्या आत्महत्येने मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे. रिअॅलिटी शोमध्ये डान्स करून प्रसिद्धी मिळवलेल्या डान्सरने धक्कादायक पाऊल उचललं आहे. डान्सरने प्रेमात धोका मिळाल्यानंतर टोकाचा निर्णय घेतला. काव्या कल्याण असे आत्महत्या केलेल्या डान्सरचे नाव आहे. काव्याच्या मृत्यूने मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे.
तेलगु रिअॅलिटी शो ‘धी’मुळे घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध डान्सर काव्या कल्याणने आत्महत्या केली आहे. काव्या कल्याणच्या आत्महत्येने मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्याआधी काव्याने सेल्फी व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओमध्ये काव्याने आत्महत्या का करत आहे, याविषयी खुलासा केला. काव्या कल्याणने मृत्यूआधी व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यात काव्याने म्हटलं की, ‘मला न्याय हवा आहे. मला अभिने धोका दिला. तो दुसऱ्या मुलीसोबत लग्न करत आहे. त्याने घरातून जाण्यासाठी सांगितलं. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. सॉरी मॉम, सॉरी डॅड’.
दरम्यान, काव्या कल्याण आणि तिचा बॉयफ्रेंड अभि उर्फ अभिलाश या दोघांनी रिअॅलिटी शो ‘धी’मध्ये एन्ट्री मारली होती. ते दोघे मागील ५ वर्षांपासून एकत्र राहत होते. दोघांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा आहे. काव्याच्या व्हिडिओच्या आधारावर पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी काव्याने आई-वडिलांची माफी मागितली. तसेच तिने न्यायाची देखील अपेक्षा केली. काव्याच्या मृत्यूने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे.