जळगाव मिरर | ३ मार्च २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता लातूरमधून एक भयानक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये ST बस उलटून 20 ते 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. लातूर-चाकूर मार्गावरील नांदगावपाटीजवळ हा भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस अहमदपूरवरून लातूरच्या दिशेने येत होती. नांदगावपाटीजवळ अचानक बाईक बससमोर आली. बाईक चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे ST वरील नियंत्रण सुटले आणि बस अनियंत्रित झाली. मुख्य रस्त्यावरून टर्न घेताना हा अपघात झाला. ही बस उलटल्याने बसमधील 20 ते 25 प्रवासी गंभीर जखमी झाले. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या अपघातात पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने लातुर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात अनेकांचे हात तुटले आहेत असून अपघात स्थळी जखमी प्रवाशांची बोटे तुटून पडली आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.