जामनेर : प्रतिनिधी
सुनसगाव येथील फाट्याजवळ इनोव्हा गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन मित्र जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी रात्रीच्या सुमारास सुनसगाव फाट्याजवळ घडला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जळगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, जीवन शिवाजी कोळी (वय 25), विकास संजय पाटील (वय 27) दोघे रा. माळपिंपरी असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवार रात्रीच्या सुमारास सुनसगाव फाट्याजवळ गाडीने जबर धडक दिल्यामुळे दोघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जळगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जीवन कोळी व विकास पाटील दोघे जिवलग मित्र होते.