जळगाव मिरर | १२ मार्च २०२५
नात्याला काळिमा फासणारी घटना नवी मुंबईतील वाशीच्या जुहूगाव परिसरातून समोर आली आहे. घरातील बेडरूममध्ये कपडे बदलत असताना बापानेच आपल्या मुलीचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीने बापाविरोधात वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पीडित मुलगी २८ फेब्रुवारी रोजी तिच्या आईसोबत बाहेर जात होती. त्यासाठी ती बेडरूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली. त्याआधीच नराधम बापाने बेडरूममधील कपाटात मोबाईल कॅमेरा सुरू करून ठेवला होता. मुलगी खोलीत गेली आणि कपडे बदलू लागली. लपवलेल्या मोबाईलमधून व्हिडिओ चित्रण सुरू होते. तेवढ्यात व्हिडिओ चित्रण होत असल्याचे मुलीच्या लक्षात आले. व्हिडिओ बनवत असल्याचे मुलीला समजले आहे, हे नराधम बापाच्या लक्षात आले. त्याने पीडित मुलगी कामावर जात असताना तिचा हात पकडला आणि याबाबत कोणाला सांगितलं किंवा पोलिसात गेलीस तर ठार मारून रस्त्यावर फेकून देईल, अशी धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या पीडितेने वाशी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.