जळगाव मिरर | १७ मार्च २०२५
धाराशिव जिल्ह्यातील तालुक्यातील दुधोडी येथील १२ वीचा विद्यार्थी माउली बाबासाहेब गिरी याला प्रेमप्रकरणातून पांढरेवाडी(ता. परंडा) येथे लोखंडीरॉड आणि काठीने बेदम मारहाण झाली होती. सोलापूर येथे उपचार सुरू असताना १४ दिवसांनंतर रविवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी युवतीचे वडील आणि पतीसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माउलीचे वडील बाबासाहेब गिरी यांनी अंभी पोलिसांत गुन्हा दाखल केला असूनयातील आरोपी मुलीचे वडील सतीश जगताप, पती राहुल मोहिते (रा. पांढरेवाडी,परंडा), पतीचे मित्र आकाश मगर (रा.शेळगाव, ता. परंडा), विजय पाटील (रा.सोनारी, ता. परंडा) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपी फरार आहेत.
माउली गिरी याचा थोरला भाऊ शेखरगिरी याने कौटुंबिक तणावातून दोनवर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. आतामाउलीचाही मृत्यू झाला आहे. यामुळेत्याच्या आई, वडिलांचा सांभाळकरण्यासाठी घरात कोणीही नाही. त्यांचादुसरा आधारही गेला. माउलीच्या बहिणीचा विवाह झालेला आहे. संबंधित युवती व माउली हे वेगवेगळ्यासमाजातील होते. मात्र, वर्गात एकत्रअसल्यामुळे त्यांची ओळख झालीहोती. यातूनच त्यांचे प्रेमात रुपांतर झालेहोते. युवतीने खर्डा येथील कनिष्ठमहाविद्यालयात दहावीनंतर प्रवेशघेतला. नंतर माउलीनेही तेथे प्रवेशघेतला. दोघांची बारावीची परीक्षा सुरूहोती. दरम्यान, युवतीचा अल्पवयीन असतानाच वर्षभरापूर्वी विवाह झाला.
माउलीचा जीव घेण्याच्या दृष्टीनेच त्याला मारहाण झाली असल्याचेतपासातून समोर येत आहे. त्यालाछाती, पोटावर तसेच गुप्तांगावरलोखंडी रॉड आणि काठीने मारहाणकरण्यात आली होती. त्याचा मृतदेहटाकून देण्यात आल्यानंतर तेथेचअधिक प्रमाणात रक्तस्राव झाला होता.रुग्णालयात दाखल केल्यापासून त्याचीप्रकृती गंभीर होती. मुलीलाही अाराेपी करा माउली याच्या मैत्रिणीसह तिचे वडीलयांना तातडीने अटक करावी. सर्वआरोपींवरती मोका कायदा लावावा.मुलीने फोन करून माऊलीला गावातबोलावून घेतल्याने तिलाही याघटनेमध्ये आरोपी करावे, अशी मागणीमृत माउलीचे वडील बाबासाहेब गिरीयांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. मृत माउलीचे (१८) व परंडातालुक्यातील पांढरेवाडी (ता. परंडा)येथील युवतीचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. पाथरुड (ता. भूम)येथे ९ वी, १० वीत शिक्षण घेतअसल्यापासून प्रेमसंबंध जुळले होते.युवती मामाच्या गावी वडाचीवाडी येथेराहायला होती. तेथे राहूनच ती पाथरुडयेथे ये-जा करत शिक्षण घेत होती.




















