जळगाव मिरर | १८ मार्च २०२५
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना नियमित घडत असून यावर पोलीस प्रशासनातर्फे चोरटे देखील ताब्यात येत आहे मात्र चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत असताना आता चक्क एखाद्या सिरीयलच्या कथानकाप्रमाणे चोरट्यांनी भडगावात भिंत फोडून ज्वेलर्स दुकानातून सहा किलो चांदीसह रोकड लांबवली. ही घटना मंगळवार, 18 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगावातील नामांकित घोडके ज्वेलर्स दुकानाचे मालक गेल्या दोन दिवसांपासून बाहेर गावी गेल्याने दुकान बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केल. आणि मोठ्या प्रमाणात चांदी व रोकड लंपास केली. चोरीची माहिती मंगळवारी सकाळी उघडकीस आली. शहराच्या मध्यवर्ती भागातच धाडसी चोरी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेने शहरातील व्यापारी आणि नागरिक अस्वस्थ झाले आहेत.
भडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा केला. चोरट्यांनी भिंत फोडण्यासाठी वापरलेली हत्यारे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.




















