जळगाव मिरर | ३१ मार्च २०२५
राज्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गा वरील मस्तान नाका उड्डाणपुलावरून टँकर कोसळून झालेल्या अपघातात मस्तान नाका भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मस्तान नाका उड्डाणपुलाच्या गुजरात वाहिनीवर अनियंत्रित झालेला टँकर पुलाच्या कठड्याला धडकल्यानंतर पंधरा ते वीस फूट उंचीवरून पुलाच्या खाली कोसळला. अपघात ग्रस्त टँकर मधून कच्च्या तेलाची गळती सुरु झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुदैवाने कच्चे तेल ज्वलनशील नसल्याने पोलिसांनी सुटकेचा स्वास घेतला. स्थानिकांच्या मदतीने अपघातात गंभीर जखमी टँकर चालकाला बाहेर काढून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघाता नंतर अपघात ग्रस्त टँकर मधील बेस ऑइल गळती सुरु झाली होती.
30 हजार लिटर क्षमतेच्या टँकर मधून तेलाची मस्तान नाका भागातील दुकानदार, रिक्षा चालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मस्तान नाका परिसर ऑइलमय झाला होता. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून बघ्यांच्या गर्दीला हटवून परिसर निर्ममनुष्य केला. तसेच उड्डाणपुला खालील गुजरात मार्गीकेवरील वाहतूक बंद केली होती. दोन क्रेनच्या साहाय्याने अपघात ग्रस्त टँकर रस्त्यावरून हटवण्यात आल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.