
मेष राशी
मेष राशीच्या व्यक्तींना आज विनाकारण धावपळ करावी लागेल. ज्यामुळे मन उदास राहील. बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवा, अन्यथा त्रास होऊ शकतो. मालमत्तेसंबंधी न्यायालयीन प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या व्यक्तींना आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. व्यवसायात नवीन संधी येतील. पण भागीदारीने व्यवसाय करणे टाळा. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सावध राहावे. तुमचे मन सतत चिंतेत राहील
मिथुन राशी
मिथुन राशीसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. कारण तुम्ही नवीन वाहन खरेदी कराल. यामुळे तुमची अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. नवीन कामात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कायदेशीर बाबींमध्ये चांगला राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कुटुंबात तुमच्या मताचा आदर केला जाईल. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका.
सिंह राशी
सिंह राशीच्या व्यक्तींना आज अचानक धनलाभ संभवतो. वाहन चालवताना मात्र अधिक काळजी घ्या. व्यवसायात भागीदारीचे करार टाळण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठ लोकांकडून सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल.
कन्या राशी
कन्या राशीच्या व्यक्तींना आज मानसिकरित्या गोंधळलेल्या असतील. त्यामुळे कोणताही निर्णय घेणे कठीण जाईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.
तूळ राशी
तूळ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. यामुळे मान-सन्मानात वाढ होईल. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांशी बोलताना भान ठेवा.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचे नवीन मार्ग उघडेल. व्यवसायात नफा होईल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणत्याही वादात पडू नका. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहील.
धनु राशी
धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य राहील. विरोधकांपासून सावध राहा. इतरांच्या गोष्टीत ढवळाढवळ करू नका. आरोग्यात सुधारणा दिसेल. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल. एखादा जुना मित्र बऱ्याच दिवसांनी भेटेल.
मकर राशी
मकर राशीच्या व्यक्तींचे मन आज काही गोष्टींमुळे चिंतित राहू शकते. कामात किंवा व्यवसायात बदल करावे लागतील. पण धोकादायक निर्णय घेणे टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्यामुळे तुमचा प्रियकर नाराज होईल. एखाद्या कामासाठी प्रवास करावा लागेल.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात नफा होईल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आरोग्यात सुधारणा जाणवेल. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खरेदी करण्यात जाईल. कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयाने आनंदी राहतील. व्यवसायात चांगली कमाई होईल.