
जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२५
बी.यू.एन. रायसोनी स्कूल (सीबीएसई पॅटर्न), प्रेमनगर, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पार पडलेल्या राज्यस्तरीय ‘मंथन परीक्षा’ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या १००% विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदविला होता.
या परीक्षेमध्ये २० विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले असून, यामध्ये पहिलीतून गौरांग जाधव (प्रथम), नियती पाटील (द्वितीय), सिद्धेश मेढे (तृतीय), दुसरीच्या वर्गांतून आचल जाखेटे (प्रथम),रिया भोईटे (द्वितीय), सान्वी साळुंखे (तृतीय), तिसरीच्या वर्गातून तेजस कोटकर (प्रथम), पारस डोडे (द्वितीय), लक्ष शिंपी (तृतीय), चौथीच्या वर्गातून, वैष्णवी पोतदार (प्रथम), रितेश पेटकर (द्वितीय), आर्या मुक्कावर (तृतीय), पाचवी- उर्जीत रायसोनी (प्रथम), यासीर मन्यार (द्वितीय), इयत्ता ६ वी:- पार्थ पोतदार (प्रथम), यज्ञेश चव्हाण (द्वितीय), इयत्ता ७ वी:- पुर्वा खळसे (प्रथम), आरोही पाटील (द्वितीय), इयत्ता ८ वी:-धवल निकम (प्रथम) यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी व उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. या विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य मनोज शिरोळे, स्पर्धा परीक्षा प्रमुख मोनिका निकम व शिक्षकवृंदांचे मार्गदर्शन लाभले.