मेष राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज विरोधक नमते घेतील. तुम्ही तुमचं काम योग्य रीतीने पूर्ण करू शकाल. तरुणांना काही चांगले यश मिळेल. या काळात तुमच्या बजेटची काळजी घ्या. घराशी संबंधित कोणतेही काम महाग पडू शकते. कोणाबद्दलही नकारात्मक विचार ठेवू नका. भागीदारीसंबंधित व्यवसाय पूर्वीसारखाच चालू राहील. पती-पत्नीचे नाते गोड राहील. आरोग्य चांगले राहील.
वृषभ राशी
श्रीगणेश सांगतात की, स्थानबदलासंबंधी योजना सुरू कराण्यासाठी योग्य वेळ आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. जवळच्या मित्राचा सल्ला अनेक अडचणींमधून मुक्ती देईल. कोणत्याही गैर किंवा बेकायदेशीर गोष्टीत रस घेऊ नका, त्यामुळे अपमानास्पद परिस्थिती निर्माण होऊ शकते. कुटुंबीतील सदस्यांची साथ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे.
मिथुन राशी
सध्या तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीत काही बदल जाणवतील. या बदलाचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम होईल. फक्त तुमची ऊर्जा एकत्र करून पुन्हा नव्या योजना तयार करणे गरजेचे आहे. कोणत्याही वडीलधाऱ्याशी किंवा आदरणीय व्यक्तीसोबत मतभेद होऊ देऊ नका, असा सल्ला श्रीगणेश देतात. नशीब हे केवळ कष्टानेच मिळते, हे लक्षात ठेवा. व्यवसायात आज काही सकारात्मक आणि फायदेशीर घडामोडी घडतील. कुटुंबात वादविवादाची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. आरोग्य उत्तम राहील.
कर्क राशी
श्रीगणेश म्हणतात की, परिस्थिती अनुकूल आहे; पण भावना न दाखवता शहाणपण आणि बुद्धीने वागणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. एखादा मित्र किंवा जवळचा नातेवाईक अचानक घरी येऊ शकतो. कोणत्याही समस्येवर चर्चेतून मार्ग काढा. राग आणि घाई तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. व्यवसायावर तुमचा ताबा राहील. घरातील छोट्या मोठ्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता.
सिंह राशी
श्रीगणेश सांगतात की, हा वेळ आत्मपरीक्षणाचा आहे. इतरांच्या प्रभावाखाली न येता तुमच्या तत्वांनुसार वागा. विद्यार्थी, नोकरी किंवा मुलाखतीमध्ये यशाचे योग आहेत. काही महत्त्वाची वस्तू हरवण्याची किंवा चोरीची शक्यता आहे, काळजी घ्या. सुरू असलेल्या कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. सध्या व्यवसायाशी संबंधित कामांवर अधिक लक्ष द्या. वैवाहिक जीवनात गैरसमज निर्माण होऊ शकतो.
कन्या राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज प्रॉपर्टीशी संबंधित कोणतेही काम करण्यासाठी वेळ अत्यंत अनुकूल आहे. कुटुंबासह धार्मिक स्थळी जाण्याचा कार्यक्रम ठरेल. मानसिक शांतता लाभेल. एखाद्या प्रिय मित्रासोबत भेटवस्तूंची देवाणघेवाण होऊ शकते. काही तणाव जाणवेल. मानसिक स्थिती मजबूत ठेवा. लवकरच परिस्थिती सामान्य होईल. समस्यांना घाबरण्याऐवजी त्यांचे निराकरण शोधण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण शिस्तबद्ध राहील.
तुळ राशी
श्रीगणेश सांगतात की, सध्या नशिब तुम्हाला प्रत्येक परिस्थितीशी झुंजण्याचे बळ देत आहे. वेळेचा सर्वोत्तम उपयोग करा. तुमचा निर्णय सर्वोच्च ठेवा. इतरांवर विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. सर्व जबाबदाऱ्या स्वतःवर घेण्याऐवजी वाटून घ्या. इतरांच्या अडचणीत पडल्यामुळे तुमच्या वैयक्तिक कामांवर परिणाम होऊ शकतो, याची जाणीव ठेवा. व्यवसायात तुमच्या मेहनतीनुसार योग्य फळ मिळेल. कामासोबत योग्य विश्रांतीही आवश्यक आहे.
वृश्चिक राशी
आज आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही मोठे यश प्राप्त करू शकता. काही नकारात्मक परिस्थिती येतील पण तुम्ही त्या सहज सोडवू शकाल. सध्या मुलांना योग्य मार्गदर्शन देणे अत्यंत गरजेचे आहे. व्यवसायाच्या दृष्टीने परिस्थिती अतिशय अनुकूल आहे. थोडा वेळ कुटुंबीयांसोबत मनोरंजनात घालवा. आरोग्य ठीक राहील.
धनु राशी
श्रीगणेश म्हणतात की, काही काळापासून सुरू असलेली समस्या सुटेल. खूप दिवसांनी मित्रांबरोबर एकत्र येणे आनंददायी आणि उत्साही ठरेल. दैनंदिन जीवनातून थोडा आराम मिळेल. मुलांशी संवाद साधताना काळजी घ्या अन्यथा त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुमच्या नकारात्मक बोलण्यामुळे एखाद्या प्रिय मित्राचा अपेक्षाभंग होऊ शकतो, याची जाणीव ठेवा. व्यवसायातील सर्व कामे अडथळ्याविना पूर्ण होतील. पती-पत्नीचे नाते गोड राहील. आरोग्य चांगले राहील.
मकर राशी
श्रीगणेश म्हणतात की, तुमच्यासाठी काळ अनुकूल आहे. करिअर, अध्यात्म आणि धर्माच्या प्रगतीसाठी तुमच्या क्षमतेचा योग्य उपयोग करू शकाल. तुमच्या संवेदनशीलतेमुळे समाजात मान मिळेल. काहीवेळा किरकोळ कारणांवरून राग आल्यामुळे घराचे वातावरण बिघडू शकते. हा दोष सुधारण्याची गरज आहे. व्यवसायात यशस्वी वेळ आहे. तुमचे कामाची गती वाढेल. वैवाहिक जीवन गोड राहील. मधुमेहचा त्रास असणार्यांनी विशेष काळजी घ्यावी.
कुंभ राशी
काही काळापासून सुरू असलेल्या धावपळीपासून मुक्त होण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवा. शांत वातावरणात तुम्हाला ऊर्जा मिळेल. सृजनशीलतेत आणि कलात्मक कामांमध्ये रस निर्माण करण्याचा योग्य काळ आहे. मुलांबरोबर थोडा वेळ घालवणे आवश्यक आहे. त्यांच्या हालचाली आणि संगतीकडे लक्ष ठेवा. कोणत्याही समस्येवर जवळच्या मित्राशी चर्चा करा. व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असा सल्ला श्रीगणेश देतात. आरोग्याची काळजी घ्या.
मीन राशी
श्रीगणेश सांगतात की, सध्या ग्रहस्थिती आर्थिक योजनांशी संबंधित कामांकडे लक्ष देण्याचा इशारा देत आहे. निरुपयोगी कामांमध्ये वेळ वाया घालवू नका. घरात एखाद्या अविवाहित व्यक्तीच्या विवाहाविषयी चर्चा होऊ शकते. इतरांवर खूप विश्वास ठेवणे आणि त्यांच्या बोलण्यात येणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. तरुण चुकीच्या मनोरंजनामुळे करिअरचे नुकसान करू शकतात. व्यवसायात कोणतेही नवीन काम किंवा योजना यशस्वी होणार नाहीत.