
जळगाव : प्रतिनिधी
नेरी ते वावडदा रस्त्यावर भरधाव मालवाहू गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत मोताळा येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. तर मालवाहू गाडीतील तीन जण जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नेरी ते वावडदा मुख्य रस्त्यावर एरंडोलकडे जाणाऱ्या महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी (जीजे ०५ बीटी ६४८९) ने जात असतांना समोरून येणाऱ्या दुचाकी (एमएच २८ डब्ल्यू ९४४०) ला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी १० जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार साहेबराव चिमा शिंदे रा. चिंचखेडा ता. मोताळा जि. बुलढाणा हा तरूणाचा मृत्यू झाला. तर गाडीतील चालकासह इतर दोघे जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रूग्णवाहिकेने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे. महिंद्रा पिकअप गाडी हा रस्त्याच्या चारीत पडली. अपघात झाल्यानंतर विटनेरचे पोलीस पाटील साहेबराव धुमाळ यांच्यासह नागरीकांना घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान मयत तरूण हा कामानिमित्त साक्री येथील विजापूर येथे आपल्या नातेवाईकांकडे गेले होते.




















