
जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनच्या राज्यातील संलग्नित जिल्हा सचिवांची सभा १० जुलै रोजी निसर्गरम्य अश्या जैन व्हॅली येथे महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार्थी प्राचार्य डॉ.हनुमंत लुंगे यांचे अध्यक्षतेखाली वरिष्ठ पदाधिकारी श्री शंकरराव शहाणे, हाजी प्रा ईकबाल मिर्झा यांचे उपस्थितीत संपन्न झाली. प्रारंभी गतवर्षी डॉजबॉल परिवारातील दिवंगत व्यक्तींना शांतिमंत्राद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सभेच्या विषयपत्रिकेनुसार यावर्षी प्रथम सत्रातील महाराष्ट्र राज्य सबज्युनियर स्पर्धा उस्मानाबाद येथे तर राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धा डेरवण अथवा अमरावती येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले जिल्हा संघटनेच्या अडीअडचणीवर चर्चा करण्यात आली राज्य स्पर्धेच्या प्रवेशिका ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय रेफरी सेमिनारमध्ये महाराष्ट्रातील सहभागी होणाऱ्या पंचाची निवड करण्यात आली. असोसिएशनचे सर्व कामकाज ऑनलाईन होणेबाबत टेक्नोसेव्ही समिती स्थापन करण्यात आली राज्य स्पर्धेचे आयोजन विभागानुसार करण्याचे निश्चित करण्यात आले राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान राज्य संघातील खेळाडूंना सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध मिळणेबाबत नियमावली तयार करण्यात आली राज्य असोसिएशन पदाधिकारी निवडीबाबत धोरण ठरविण्यात आले शालेय राज्य, राष्ट्रीय स्पर्धा तसेच राज्य क्रीडा कार्यालयाचे स्पर्धा धोरण यावर चर्चा करण्यात आली.

चर्चेत शंकरराव शहाणे (परभणी), राजेश जाधव (जळगाव), मुकुंद झनकर (नाशिक), डॉ हरिश काळे (अमरावती), डॉ सुनिल पंढरे (बीड), कैलास करवंदे (बुलढाणा), प्रा धन्यकुमार हराळ (अहमदनगर), डॉ महेश राजेनिबांळकर (उस्मानाबाद), आनंद पवार (धुळे) अशोक परीट (लातूर), निलेश भगत (यवतमाळ), जगदीश अचंन (मुबंई), गिरीश काळे (अकोला), नरेश राऊत (ठाणे), शितल भंडारी (पुणे), यांनी आपले विचार मांडले. राज्य सचिव शिवछत्रपती पुरस्कार्थी प्राचार्य डॉ.हनुमंत लुंगे यांनी भारतीय डॉजबॉल महासंघाच्या स्पर्धा आयोजन, रेफरी सेमिनार, राष्ट्रीय स्पर्धा आयोजन राज्य असोसिएशनचे आगामी काळातील ध्येय धोरण याविषयावर सविस्तर माहिती दिली तसेच सचिवांच्या शंकाचे समाधान केले. सभेचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ हरिश काळे यांनी केले उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, निलेश पाटील, प्रशांत कोल्हे, गिरीश पाटील, योगेश सोनवणे, सचिन महाजन, गिरीश महाजन, सचिन सूर्यवंशी, विजय विसपुते, प्रा समीर घोडेस्वार , अमित जगताप, उमाकांत जाधव, पंकज पाटील, प्रसन्न जाधव, धिरज पाटील यांनी केले.
आषाढी एकादशी निमित्त आमदार श्री मंगेश चव्हाण यांचे तर्फे प्रमुख अतिथीनां विठ्ठल-रुखमाईची विलोभनीय मूर्ती तर प्रमुख अतिथी व उपस्थित सर्व सचिवांना आमदार श्री राजुमामा भोळे यांचे तर्फे कवियत्री बहिणाबाई चौधरी यांची कहाणी व गाणी हे पुस्तक भेट देण्यात आले सभेस मुबंई शहर, मुबंई उपनगर, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे, उस्मानाबाद, लातूर, जालना, परभणी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, भंडारा, यवतमाळ, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सातारा, वाशीम, रायगड, गोंदिया, हिंगोली व जळगाव या जिल्ह्याचे सचिव व प्रतिनिधी यांची उपस्थिती होती सभेची सांगता राष्ट्रगीताने झाली.





















