जळगाव मिरर | ४ जुलै २०२५
शहरातील बळीरामपेठेतील आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ हे जळगाव शहरातील नावलौकिक असे मंडळ आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी नाविन्यपूर्ण आरास साकारण्यात येते. इस्त्रोचे वैज्ञानिक पैलूवर आरास साकारून शहरातील विद्यार्थ्यांना इस्त्रो वैज्ञानिक होण्याची प्रेरणा दिली. भलीमोठी INS विक्रांत साकारून नौदलाचे यश सर्वांसमोर मांडले तसेच भारत शासनाचा नदीजोड प्रकल्प साकारून जलक्रांतीचे स्वप्न बघण्यासाठी सामान्य जनतेला प्रेरित केले.
यंदा आझाद क्रीडा व मित्र मंडळाच्या वतीने भारताचे सुपर संगणक ‘परम ८०००’ ची प्रतिकृती सादर करून भातातील वैज्ञानिकांचा इतिहास सर्वांसमोर मांडणार आहे. पद्मश्री डॉ.विजय भटकर यांनी तयार केलेला हा भारतातील सुपर संगणक याची यशोगाथा आणि त्यांचे चित्रण करून सर्वांसमोर आरास स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न मंडळ करणार आहे. यासाठी काल, मंडळाचे सदस्य आश्विन भोळे, प्रा.कृणाल महाजन, चेतन पाटील, मयूर पाटील, रुपेश पाटील आदींनी पद्मश्री डॉ.विजय भटकर यांची भेट घेऊन ‘परम संगणक ८०००’ ची सर्व माहिती प्राप्त करून घेतली तसेच तिच्या निर्मितीचे यशोगाथा त्यांच्याकडून समजून घेतली.
शेवटी प्रा.कृणाल महाजन यांच्या विनंतीला मान देऊन पद्मश्री डॉ.विजय भटकर यांनी प्रकृती स्वस्थ असेल तर गणेशोत्सवात जळगाव येथे येऊन नागरिकांशी संवाद साधण्याच्या विनंतीला होकार दिला आहे. बळीरामपेठेतील मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम करून ‘परम संगणकाची प्रतिकृती तयार करून शहरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचा संकल्प केला आहे. लवकर मंडळातील सदस्य एकत्र येऊन कार्याचा श्रीगणेशा करणार आहे
