जळगाव मिरर | ७ जुलै २०२५
विविध क्षेत्रात शाळेची ओळख निर्माण करून देणारे हे विद्यार्थीच खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन डायटचे माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड यांनी केले. विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित ‘शास्वत २५’ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी शाळेच्या सभागृहात आयोजित या रौप्य महोत्सवाची सुरुवात २५ दिवे प्रज्वलित करून झाले व विद्यार्थ्यांनी नृत्य,भजन,अभंग असे सादरीकरण केले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षणाधिकारी व केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीळकंठ गायकवाड आणि शाळेच्या माजी विद्यार्थिनी व वनविभागात संवर्धन तज्ञ म्हणून कार्यरत धनश्री ठाकरे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाला विवेकानंद प्रतिष्ठानच्या उपाध्यकक्षा हेमाताई अमळकर,शाळेचे माजी प्राचार्य जयंत टेंभरे, सतीश मोरे,शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष कौशल गांधी,सदस्य सरल चोपडा व माजी विद्यार्थ्यांचे पालक यांची उपस्थिती होती.शाळेचे माजी विद्यार्थी व रणजी ट्रॉफीचे खेळाडू शिवप्रसाद पुरोहित यांच्या हस्ते नवीन क्रिकेटच्या धावपट्टीचेउदघाटन करण्यात आले.प्राचार्य प्रवीण सोनवणे यांचे मार्गदर्शनात शास्वत :२५ या म्हणून माजी विद्यार्थ्यांना सहभागी करून वर्षभर विविध उपक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती शाळेच्या प्राथमिक विभागाच्या समन्वयक स्वाती अहिरराव यांनी दिली.पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक स्तराच्या समन्वयक शिक्षिका,शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन, कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
शाळेच्या शिक्षिका दीदी…
शाळेच्या पहिल्या व दुसऱ्या बॅचच्या नामंकित विद्यार्थ्यांच्या कौतुकास्पद कार्याची दखल घेऊन ‘वॉल ऑफ फेम’ अशा अनोख्या संकल्पनेचे या विद्यार्थ्यांच्या व पालकांचे हस्ते अनावरण करण्यात आले. यामुळे माजी विद्यार्थी,पालक तसेच शाळेतील शिक्षक व कर्मचारी भारावले.काशिनाथ पलोड शाळेचे वेगळे वैशिष्ट्य सांगतांना संवर्धनतज्ज्ञ धनश्री ठाकरे म्हणाल्या की,या एकमेव शाळेतील शिक्षिका यांना ‘दीदी’ म्हणून संबोधित केले जाते.त्यामुळे आपुलकीची भावना निर्माण होऊन आम्ही अगदी कौटुंबिक म्हणून वावरलो अशी आठवण यांनी ताजी केली. सर्व शिक्षिका या आठवणीमुळे खूप भारवले
