जळगाव मिरर | ८ जुलै २०२५
राज्यातील मंत्रिमंडळाचे पावसाळी अधिवेशन विधान भवनात सुरू आहे. यावेळी विरोधी पक्षांचे नेते विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी करत होते. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या व उपसभापती नीलम गोऱ्हे या विधानभवनात आल्या तेव्हा आदित्य ठाकरे यांनी ‘मर्सिडीज खोके, एकदम ओके’, अशा घोषणा देण्यास सुरू केले. तेव्हा नीलम गोऱ्हे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे चिडून पाहिले. याचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे.
सभागृहात बोलताना विरोधकांनी सरकारला अनेक मुद्यांवरून घेरले आहे. तसेच सभागृहाच्या बाहेर देखील घोषणाबाजी देत सत्ताधाऱ्यांची चांगलीच मजा घेणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. आदित्य ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांना पाहताच ‘मर्सिडीज खोके एकदम ओके’, अशी घोषणा दिली. ही घोषणा ऐकताच नीलम गोऱ्हे संतापल्याचे पाहायला मिळाले. पायऱ्या चढून वर गेल्यावर त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे रागाने पाहिले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देखील मंत्री भरत गोगावले यांना पाहताच ‘ॐ फट स्वाहा’, अशा घोषणा देणे सुरू केले होते. एकंदरीतच विरोधकांनी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सत्ताधाऱ्यांकडून चांगलीच मजा घेणे सुरू असल्याचे दिसत आहे.
नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना पद मिळवायचे असेल तर मर्सिडीज द्यावी लागते, असा आरोप केला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ‘मर्सिडीज ओके’ अशी घोषणा दिली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीझ दिल्या की पदे मिळायची, असा खळबळजनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी एका मुलाखतीत बोलताना केला होता. तसेच शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसे आणली जायची. गल्ला गोळा करण्याचे काम एकनाथ शिंदेंना दिले होते, असेही त्यांनी काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते.
