जळगाव मिरर | १२ जुलै २०२५
शहरातील आर.आर.विद्यालयात खेळत असताना अचानक जमिनीवर पडल्याने नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दि.११ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. कल्पेश वाल्मीक इंगळे (वय १५ रा. कठोरा जि. बुलढाणा ह.मु. कासमवाडी) असे मयत झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, कल्पेश इंगळे हा विद्यार्थी आई वडील, बहीण आणि लहान भावासोबत वास्तव्याला होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी ११ जुलै रोजी सकाळी शाळेत आलेला होता. दुपारी ३ वाजता शाळेच्या मधल्या सुट्टीत जेवणासाठी सुट्टी झाली होती. विद्याध्यर्थ्यांसोबत खेळत असतात तो अचानक जमिनीवर कोसळला अशी माहिती शाळेची शिक्षकांनी दिली आहे. दरम्यान त्याला शिक्षकांनी उचलून तातडीने जवळच असलेल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. यावेळी कल्पेशच्या आई वडील आणि भाऊ यांनी एकच आक्रोश केला होता.
दरम्यान कल्पेश याच्या आई-वडिलांनी इतर विद्यार्थ्यांकडून त्याला मारहाण झाली. सकाळी गेला तेव्हा तो चांगला होता दोन दिवसांपूर्वीसुद्धा त्याचा वाद झाला होता, त्यामुळे शाळेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यावे फुटेज तपासण्यात यावे, चौकशी करावी व दोषींवर अटक करून कारवाई करावी त्यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार असल्याची मृत कल्पेश याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. कल्पेश याच्या पश्चात आई शीतल वडील एक भाऊ वेदांत आणि एक बहीण प्रगती असा परिवार आहे.
