जळगाव मिरर | १४ जुलै २०२५
मित्राच्या घरी तसेच एका घरात नेवून शिरपुर येथील मुलीवर जळगावात अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दि. १० रोजी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित अमोल सवयलाल राठोड (रा. नेरी, ता. जामनेर) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, धुळे जिल्ह्यातील शिरपुर येथील एक तरुणीचे इन्सटाग्रावर अमोल राठोड या तरुणासोबत ओळख झाली. त्यामुळे त्या तरुणीचे नियमीत तरुणासोबत फोनवर बोलणे सुरु होते. दि. १० जुलै रोजी सकाळी १० वाजता अमोल राठोड या तरुणाने तरुणीला जळगाव बस स्टॅण्वर भेटण्याकरीता बोलाविले होते. त्यावेळी तरुणीने मी शाळेत जाते असे सांगून अमोल राठोडला भेटण्याकरीता आली होती. यावेळी अमोल राठोड हा त्याचा मित्र राजू रोहीदास राठोड याच्यासोबत आला होता. त्यांनी तरुणीला राजू राठोडच्या घरी घेवून गेला होता. त्यावेळी राजू राठोड हा पत्नीसह कामानिमित्त बाहेर गेलेला असतांना अमोल राठोड याने तरुणीला शारिरीक संबंधासाठ जबरदस्ती करु लागला, परंतू तरुणीने त्यास नकार दिला होता.
त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित अमोल राठोड याने तरुणीला भाड्याने घेतलेल्या रुमवर घेवून गेला. त्याठिकाणी तरुणीच्या ईच्छेविरुद्ध त्याने अत्याचार केला. त्यानंतर तरुणीला त्याचा मित्र राजू राठोड याच्या घरी सोडून तो तेथून निघून गेला. तरुणी जळगावात असल्याचे समजल्यानंतर तरुणीच्या नातेवाईक हे जळगावात आले. त्यांनी तरुणीला विश्वासात घेवून चौकशी केली असता, तरुणीने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी लागलीच शिरपूर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित अमोल सवयलाल राठोड (रा. नेरी, ता. जामनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक संजय तडवी हे करीत आहे.
घडलेला प्रकार तरुणीने अमोलचा मित्र राजू राठोड याला सांगितल्यानंतर त्याने तरुणीला मी तुला घरी सोडून देतो असे म्हणाला. त्यावेळी तरुणीने तिच्या मैत्रीणीला आपबिती सांगितल्यानंतर तीने तिचा ओळखीच्या एका तरुणाला तिला घेण्यासाठी पाठविल्यानंतर तरुणीने त्या तरुणाच्या घरी गेली.
