जळगाव मिरर | २७ जुलै २०२५
शहरातील नारीशक्ती बहुउदेशीय संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी महिला विंग यांच्यातर्फे जळगाव शहरातील शाम नगर येथील पशुपतीनाथ मंदिराच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
करंज ,शिसम, निंब,वड, पिंपळ, गुलमोहर, पेरू, जांभूळ, चिंच या वृक्षाची रोपे माजी महापौर सीमा भोळे डॉ निलेश चांडक डॉ धनंजय बेंद्रे डॉ गणेश पाटील मनपा पर्यावरण विभाग प्रमुख प्रकाश पाटील प्रवीण पाटील,आर जे शुभांगी बडगुजर, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मनीषा पाटील या मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली या उपक्रमासाठी स्मिता पाटील ,वंदना मंडावरे, आशा मौर्य, नूतन तासखेडकर, हर्षा गुजराती, नीता वानखेडकर, रफिक भाई पिंजारी,श्री किशोर पाटील श्री गणेश अमृतकर ,श्री पी.आर.पाटील. श्री नाप्ते श्री चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य लाभले.
