जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२५
रावेर तालुक्यातील निंभोरा बु. येथील वाघोदा रस्त्यावर राहणाऱ्या मुकेश उर्फ विजय रमेश भंगाळे (वय ३५) या तरुणाने ३१ जुलै रोजी सकाळी आपल्या राहत्या घराजवळील जुन्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने पत्नीला मोबाईलवर “मी आत्महत्या करतो आहे” असा मेसेज पाठवला होता.
पोलिसांनी माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जुन्या खोलीत मुकेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी मुकेशच्या मोबाईलसोबत एक सुसाईड नोटही सापडली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या चिठ्ठीत नेमके काय लिहिले आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास सपोनि हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अभय ढाकणे करत आहेत.
