जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२५
शहरातील मेहरुण येथे रामेश्वर कॉलनीतील विचार वारसा फाउंडेशन गणेश मंडळाची बैठक नुकतीच संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत अध्यक्षस्थानी एकमताने मनिष चौधरी यांची तर सचिव पदी गितेश पवार यांची निवड करण्यात आली.
या वर्षीचा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करण्याचे ठरले असून नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तसेच गणेशोत्सवाच्या दहा दिवसात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे प्राथमिक नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर यंदा अभिनव असा देखावा उभारण्यात येणार असून त्याबाबतची नियोजन करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांची ७ सदस्य समिती स्थापन करण्यात आली.
मंडळाच्या अध्यक्षपदी – मनिष चौधरी, उपाध्यक्ष -ऋषिकेश राजपूत, सचिव-गितेश पवार, कार्याध्यक्ष -संकेत म्हस्कर, गौरव डांगे खजिनदार-अविनाश पाटील, निखिल शेलार, सल्लगार आशिष राजपूत, मयूर डांगे,अभिजित राजपूत, सदस्य- आकाश तोमर,अमोल ढाकणे,चेतन राजपूत,अक्षय गवई, अमोल पनाड, अजय मांडोळे,प्रशांत सोनवणे, हर्षल जाधव,प्रफुल सूर्यवंशी, मयूर सावकारे, कुणाल जुमडे, योगेश धनगर,कुणाल सोनार,यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सदस्यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
