
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील हरीविठ्ठल नगरातील तरूणाने कामाच्या ठिकाणी असतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीला आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील हरिविठ्ठल नगरातील धीरज काळे(वय-२१) हा आईवडील आणि भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. भाऊ व वडीलांसोबत फर्निचरचे काम करून उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी १४ जुलै रोजी धीरज हा वडील शिवाजी श्रावण काळे यांच्या सोबत अनुराग स्टेट बँक कॉलनी फर्निचरच्या कामाला गेला होता. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वडीलांचे लक्ष नसतांना एका खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीला आला. रामानंद नगर पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील पाटील व हरिश डोईफोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात वडिल शिवाजी श्रावण काळे, आई संगीता, भाऊ संदीप, मंगेश व विवाहित बहिण असा परिवार आहे.





















