जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२५
दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात रेड स्वस्तिक जळगाव तर्फे विद्यार्थ्यांसाठी रक्षाबंधन साजरी करण्यात आली.
जे विद्यार्थी घरापासून लांब आहे व उच्च शिक्षण घेण्यासाठी सैनिकी वस्तीगृहात वास्तव्य करून जळगाव येथे शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना रक्षाबंधनची उणीवेची जाणीव होऊ नये म्हणून रेड स्वस्तिक सोसायटी तर्फे रक्षाबंधन उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी जे विद्यार्थी उद्याचे भावी नागरिक आहे अशा विद्यार्थ्यांच्या हातावर राख्या बांधण्यात आल्या आणि रक्षाबंधनाचे महत्त्व विशद करण्यात आले. प्रास्ताविक रेड स्वस्तिक जिल्हाध्यक्ष सौ मनीषा पाटील यांनी केले.
याप्रसंगी सौ मनीषा पाटील नीता विसावे, वंदना मंडावरे, ज्योती राणे, नूतन तासखेडकर, रेणुका हिंगु ,किमया पाटील, शिल्पा बयास, हर्षाली तिवारी, स्मिता पाटील या उपस्थित होत्या .याप्रसंगी माही बयास आर्या सरताळे, नेहा मौर्य तेजल वनरा स्तुती मकवाना यांनी या विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या आभार माजी सुभेदार समाधान धनगर वसतिगृह अधीक्षक माजी सैनिकांच्या मुलांचे वसतिगृह जळगाव यांनी मानले याप्रसंगी पहारेकरी शिवाजी पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.
