मेष राशी
श्रीगणेश म्हणतात की, आपल्या व्यावहारिक कौशल्य व समजुतीमुळे अपूर्ण कामे पूर्ण करू शकाल. लोकांमध्ये तुमचे कौतुक होईल. जवळच्या मित्राच्या कामातही हातभार लावाल. कामाचा ताण जास्त असला तरीही कौटुंबिक कामांना प्राधान्य द्याल. मुलांच्या समस्येच्या निराकरणासाठी तुमचे योगदान गरजेचे राहील. भागीदारीच्या व्यवसायात परस्परांशी समन्वय राखणे आवश्यक आहे. पती-पत्नीमध्ये चांगले संबंध राहतील.
वृषभ राशी
आज तुम्हाला जिवलग मित्राला आर्थिक मदत करावी लागू शकते. तसे केल्याने मनःशांती मिळेल. कुटुंबासोबत घरगुती वस्तू खरेदी करण्यात वेळ जाईल. मित्रांसोबत फिरायला जाण्याचे नियोजन होईल. नकळत घरातील ज्येष्ठांचा अपमान होऊ नये, नाहीतर ते नाराज होतील. तरुणांनी चुकीच्या कृतींपासून लक्ष हटवून करिअरला प्राधान्य द्यावे. व्यवसायातील नवे नियोजन स्वीकारताना नीट विचार करा. पती-पत्नींमध्ये परस्परांशी सौहार्द राखणे आवश्यक आहे. आरोग्य चांगले राहील.
मिथुन राशी
आज एखाद्या खास विषयावर तुमचे लक्ष केंद्रीत राहील. धार्मिक व अध्यात्मिक कार्यात वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळेल. इतरांच्या गोष्टींत हस्तक्षेप करू नका, अन्यथा नात्यांमध्ये दुरावा वाढू शकतो. जमिनीच्या खरेदी-विक्रीसंबंधीचे व्यवहार टाळा. व्यवसायात काही आव्हाने येतील. घरात आनंददायी वातावरण राहील.
कर्क राशी
आज आवडीच्या कामांसाठी थोडा वेळ द्या. त्यामुळे नवचैतन्य मिळेल. कुटुंबातील चालू असलेली समस्या दूर होईल. जुन्या नकारात्मक गोष्टींना वर्तमानावर वर्चस्व गाजवू देऊ नका, नाहीतर जवळच्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. नातेवाईकांच्या वैवाहिक जीवनातील समस्या तुमच्याही काळजीचा विषय होऊ शकते. सार्वजनिक संबंध व मार्केटिंगसंबंधी कार्यात यश मिळेल. वैवाहिक जीवनात योग्य समन्वय राहील.
सिंह राशी
वैयक्तिक बाबतीत इतरांचा सल्ला घेण्यापेक्षा स्वतःच्या निर्णयाला प्राधान्य द्या. घरात काही बदलांचे नियोजन होईल. वेळेनुसार जीवनशैलीत बदल आवश्यक आहे. अतिशय शिस्तबद्ध व कठोर वर्तनामुळे इतरांना त्रास होऊ शकतो. व्यवसायात कर्मचाऱ्यांचा सल्लाही महत्त्वाचा ठरेल. पती-पत्नींमध्ये गोडवा राहील.
कन्या राशी
नातेवाईक व मित्रांच्या उपस्थितीने घरात आनंददायी वातावरण राहील. मुलांबद्दलची काळजी दूर होईल. धार्मिक किंवा अध्यात्मिक स्थळी वेळ घालवा. आज बेकायदेशीर कृतींपासून दूर रहा. वादात पडू नका, अन्यथा समाजात चुकीची प्रतिमा निर्माण होईल. प्रत्येक गोष्टीत संयम व शहाणपणा बाळगणे आवश्यक आहे. व्यवसायासंबंधी निर्णय घेण्यापूर्वी घरातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील.
तूळ राशी
आज काही विशेष यश मिळू शकते. आपल्या कौशल्यांना वाव मिळेल. घराच्या देखभालीत सुधारणा करू शकाल. आत्मचिंतनासाठी वेळ द्या. रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर परिस्थिती बिघडू शकते. मुलांबद्दल काही नकारात्मक गोष्टी समजल्याने काळजी वाढेल. तांत्रिक क्षेत्रातील कामांत यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. सांधेदुखी वाढू शकते.
वृश्चिक राशी
ग्रहांची साथ लाभदायक आहे. चिंतेतून व तणावातून सुटका होईल. भावंडांशी गोड संबंध ठेवल्याने कौटुंबिक वातावरणात बदल येईल. घरातील सदस्यांमध्ये मतभेद संभवतात, त्यामुळे परस्परांच्या मतांचा आदर करा. धार्मिक स्थळी गेल्याने मनःशांती मिळेल. व्यवसायातील छोट्यातल्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
धनु राशी
तुमच्यासाठी वेळ अनुकूल आहे. एखाद्या विशेष प्रकल्पात यश मिळेल. तुमच्या वाणी व शैलीने लोक प्रभावित होतील. कामाचा व्याप जास्त असूनही थकवा जाणवणार नाही. वेळेचे महत्त्व ओळखा, अन्यथा नुकसान होऊ शकते. संयम व सौम्यता आवश्यक आहे. जुन्या मालमत्तेच्या समस्येचे निराकरण अवघड ठरेल. भागीदारीच्या व्यवसायातील मतभेद दूर होऊ शकतात.
मकर राशी
आज अनेक लोकांशी भेट होईल. समारंभास जाण्याची संधी येईल. मनातील स्वप्ने व संकल्प पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे. अचानक पाहुण्यांच्या आगमनामुळे थोडी अस्वस्थता निर्माण होऊ शकते. सध्या प्रवास टाळा. शेजाऱ्यांशी संबंध बिघडू देऊ नका. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
कुंभ राशी
सध्या घेतलेला निर्णय भविष्यात लाभदायक ठरेल. तुमच्या कार्यक्षमतेमुळे कामाचा वेग वाढेल. तरुणांनी व्यवसायात बेपर्वाई करू नये, अन्यथा फसगत होऊ शकते. वारंवार जास्त विचार केल्याने महत्त्वाच्या संधी हातातून निसटू शकतात.
मीन राशी
योग्य वेळी संधीचा लाभ घ्यावा. प्रयत्नांनुसार योग्य यश मिळेल. अचानक खर्च वाढू शकतो. सध्या बजेट आखणे आवश्यक आहे. जबाबदाऱ्यांचे ओझे वाढल्याने चिडचिड होईल. व्यवसायातील तुमची समज व क्षमता यश मिळवून देईल. वैवाहिक जीवनात परस्परांशी सामंजस्य राखणे कठीण ठरेल. दिनचर्या व आहार नियमानुसार ठेवल्यास आरोग्य चांगले राहील.