
जळगाव : प्रतिनिधी
राज्य अॅथलेटिक्स ज्युनिअर स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा निवडचाचणी व अजिंक्यपद स्पर्धा दि.२४ जुलै रोजी रविवारी १४,१६ १८ व २० वर्षे वयोगटातील मुले व मुलींसाठी आयोजन करण्यात आले आहे सदर स्पर्धेतून प्रथम दोन प्राविण्य प्राप्त खेळाडू राज्य स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. महाराष्ट्र अँथलेटीक्स् असोसिएशनतर्फे ३६ वी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर अँथलेटीक्स् अजिंक्यपद स्पर्धा १४ वयोगट तुळजा भवानी स्टेडियम ,उस्मानाबाद येथे दि.१० आँगस्ट रोजी (१४ वर्षाखालील -दि.१६/११/२००८आणि १५/११/२०१० दरम्यान जन्मलेले), १८ व २० वयोगट राज्य स्पर्धा प्रियदर्शनी पार्क, नेपन सी रोड ,मुंबई येथे दि.१९ ते २१ आँगस्ट रोजी (१८ वर्षाखालील -दि.१६/११/२००४आणि १५/११/२००६ दरम्यान जन्मलेले ) व (२० वर्षाखालील -दि.१६/११/२००२आणि १५/११/२००४ दरम्यान जन्मलेले) तसेच १६ वयोगट राज्य स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल ,अमरावती येथे दि.२७ व २८ आँगस्ट रोजी (१६ वर्षाखालील -दि.१६/११/२००६आणि १५/११/२००८ दरम्यान जन्मलेले) खेळाडूंसाठी ह्या स्पर्धा होणार आहेत तरी निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ.नारायण खडके, चेअरमन प्रा.एम.वाय.चव्हाण, कार्याध्यक्ष डॉ.पी.आर.चौधरी, सचिव राजेश जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ.विजय पाटील, गिरीश पाटील व प्रा.ईकबाल मिर्झा यांच्याशी संपर्क साधावा. खेळाडूंनी आपले प्रवेश आपल्याला तालुका अॅथलेटिक्स असोसिएशनच्या सचिव यांचेकडे नियमानुसार करावेत.





















