जळगाव मिरर | ९ सप्टेंबर २०२५
गेल्या आठ ते दहा दिवसांपुर्वी नातेवाईकांकडे आलेल्या मध्यप्रदेशातील सावित्री गुरीलाल भिलाला (वय १६, मूळ रा. मलगावकोठा, ता. झिरण्या, जि. खरगोन, ह. मु. कंडारी, ता. जळगाव) या गतीमंद मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास कंडारी शिवारातील शेतात उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मध्यप्रदेशात राहणारे सावित्री भिलाला ही तरुणी आठ ते दहा दिवसांपुर्वी कंडारी येथे राहणारे नातेवाईक रवी पावरा यांच्या आली होती. रवी पावरा हे कंडारी येथील शेतकरी काशीनाथ चिंधू पाटील यांच्या शेतात मजूरीचे काम करीत असून ते तेथेच राहतात. सोमवारी सकाळी ते शेतात काम करण्यासाठी निघून गेल्यामुळे सावित्री ही घरी एकटीच होती. तीने झोपडीत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. शेतातील कामे आटोपून पावरा हे घरी परतले असता, त्यांना सावित्री हीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी घटनेची माहिती लागलीच कंडारीचे पोलीस पाटील सुर्वे यांना दिली.
पोलिस पाटील सुर्वे यांनी नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत सावित्री भिलाला हीला मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सावित्री भिलाला ही मुलगी गतीमंद असून तिच्यावर उपचार सुरु होती. त्यातूनच तीने गळफास घेतल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. यावेळी तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला.