जळगाव मिरर | १४ सप्टेंबर २०२५
शहरामधील रामेश्वर कॉलनी परिसरातील आज दि.१४ रोजी दुपारच्या सुमारास राज विद्यालयाजवळ जुन्या वादातून एका तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी चोपर, कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एकनाथ नगर येथील हर्षल कुणाल पाटील (वय १८) येथे परिवारासह राहत आहे. हात मजुरी करून त्याचा परिवार उदरनिर्वाह करीत आहे.दरम्यान रविवारी दि. १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास हर्षल पाटील, त्याचा मित्र नितीन देशमुख आणि इतर काही तरुण राज विद्यालयाजवळ दुचाकीवर बसलेले असताना अचानक ८ ते १० हल्लेखोर त्या ठिकाणी आले. त्यांनी विनाकारण हर्षल पाटील यांच्या डोक्यावर गंभीरवार केला.
जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मित्रांनी दाखल केले या ठिकाणी जखमी हर्षल पाटील याच्यावर उपचार सुरू आहेत तर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळत असल्याने घटनास्थळी गाव घेतली काही पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करत हल्लेखोरांविषयी माहिती जाणून घेत हल्लेखोरांच्या शोधार्थ कर्मचारी रवाना केली आहेत. घटनेविषयी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.