जळगाव मिरर | १६ सप्टेंबर २०२५
शहरातील रिंगरोड परिसरात भाडेतत्वावर घेतलेल्या हॉटेलमध्ये मोठा खर्च केल्यानंतर मालकाने हॉटेल खाली करुन देण्याकरीता तगादा लावला. वारंवार होणाऱ्या टॉर्चरला कंटाळलेल्या हॉटेल चालक आशिष मधुकर फिरके (वय ४८, मूळ रा. सांगवी, ता. यावल, ह. मु. संत निवृत्ती नगर) यांनी रौनक हॉटेलमध्येच गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी त्यांनी सुसाईट नोट लिहून ती व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवली होती. ही घटना रविवारी मध्यरात्री दीड वाजता उघडकीस आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मूळचे यावल तालुक्यातील सांगवी येथील आशिष फिरके हे कुटुंबियांसह संत निवृत्ती नगरात वास्तव्यास होते. रिंगरोड परिसरातील रामसहाय शर्मा यांच्या जागेत तीन वर्षापासून रौनक हॉटेल चालवून व्यवसाय करत होते. यासाठी तीन वर्षांचे अॅग्रीमेंट देखील करून दिले होते. हॉटेलसाठी मोठा खर्च केल्यानंतर अचानक शर्मा यांनी हॉटेलची जागा खाली करून देण्यासाठी तगादा लावला. त्याकरीता त्यांच्याकडून फिरके यांना सतत टॉचिंग देखील केले जात होते. तसेच वेळोवेळी त्यांचा मुल रजनील रामसहाय शर्मा याच्याकडून खूप धमक्या मिळत होत्या. त्याला कंटाळलेल्या आशिष फिरके यांनी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
आत्महत्येपुर्वी फिरके यांनी सुसाईट नोट लिहन ती स्टेटसवर ठेवन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना उघडकीस आल्यानंतर घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना देण्यात आली, त्यानुसार रात्रीच जिल्हापेठ पोलिस घटनास्थळी पोहचले व फिरके यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे.
काय लिहिले सूसाईट नोटमध्ये ?
मी आशीष मधुकर फिरके असे लिहून देतो की, माझ्या मौतीला जबाबदार फक्त आणि फक्त रामसहाय शर्मा म्हणजे हॉटेल रोनक या जागेचे मालक. मी त्यांच्या जागेत तीन वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करतो. मला यांनी आधी तीन वर्षांचे अॅग्रीमेंट करून दिले होते आणि आता मला सागितले की, बेटा टेन्शन मत ले, मै अॅग्रीमेंट तीन साल का कर दूंगा. त्यांनी मला सांगितले तू तेरे हिसाबसे हॉटेल बना ले. मी खूप खर्च पण लावला आणि आता अचानक त्यांनी मला जागा खाली करून दे असे सतत टॉचिंग करत होते. मी खूप विनंती करूनही मला त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले. मी त्यांना सांगितले की, मला दोन लहान मुले आहे, त्यांचा तरी विचार करा. तर ते मला म्हटले की मुझे कुछ लेना देना नही आणि मला खूप टॉचिंग करत होते. वेळोवेळी त्यांचा मुलगा रजनील रामसहाय शर्मा यांनी खूप धमक्या दिल्या म्हणून मी आत्महत्या करत आहे. – आशीष मधुकर फिरके