जळगाव मिरर /१६ सप्टेंबर २०२५
शहरातील नवीन बस स्थानक परिसरात आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास 35 वर्षीय तरुण पाचोरा जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातून 35 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील राधाकृष्ण नगर परिसरातील रहिवासी शिरीषकुमार तरुणकुमार सूर्यवंशी ( वय 35) हे आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील नवीन बस स्थानक परिसरातून पाचोरा जात असताना बसमध्ये चढत असताना शिरीषकुमार तरुणकुमार सूर्यवंशी ( वय 35) यांच्या खिशातून 20 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल तर दुसरा मोबाईल 15 हजार रुपये किमतीचा असा एकूण 35 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जळगाव नवीन बस स्थानक परिसरातून अनोळखी चोरट्यांनी लंपास केले आहे. याबाबत त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्थानक गाठत गुन्ह्याचे नोंद करण्याचे काम सुरू होते.
नवीन बस स्थानक बनला चोरांचा अड्डा !
शहरातील नवीन बस स्थानक परिसरात गेल्या काही महिन्यापासून मोबाईल, सोनसाखळी, पाकीट चोरांचा नेहमीच सुळसुळाट सुरू असतो त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे.