जळगाव मिरर । १९ सप्टेंबर २०२५
क्रिटींक करण्यास नकार दिल्यामुळे सासरच्यांनी मारहाण केली जात होती. त्यामुळे माहेरी आलेल्या प्रज्ञा चेतन शेळके (वय २२, रा. कर्जयी, ता. चाळीसगाव) या पाच महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरुवार दि. १८ रोजी दुपारच्या सुमारास शिरसोली प्र. न. येथे घडली. आत्महत्येपुर्वी विवाहितेने सूसाईट नोट लिहीली असून त्यामध्ये सासरच्यांवर तीने आरोप केले आहे. ही ही सुसाईट नोट पोलिसांनी जप्त केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या प्रज्ञा शेळके यांचा विवाह चाळीसगाव तालुक्यातील कर्जयी येथील चेतन शेळके यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर विवाहिता पतीसोबत पुणे येथे राहत होती. विवाहिता पाच महिन्याची गर्भवती असल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून ती शिरसोली येथे माहेरी आलेली होती. सकाळीच आई-वडील शेतात गेलेले होते. तर भाऊ हा सकाळीच पुण्याला गेला होता. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरी कोणीही नसतांना प्रज्ञा शेळके या विवाहितेने घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. आई-वडील शेतातून परतल्यानंतर घराचा दरवाजा आतून कडी लावून बंद दिसले. आवाज देवूनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने विवाहितेच्या वडीलांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्यांना प्रज्ञा हीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी हंबरडा फोडीत मनहेलावणारा आक्रोश केला. त्यानंतर विवाहितेला लागलीच खाली उतरवून त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासणी करीत तिला मयत घोषीत केले.
सासरच्यांकडून विवाहितेला सतत जात होता. तसेच ती झाल्यानंतर तीला गर्भपात करण्यासाठी तिच्यावर वारंवार दबाव आणून मारहाण देखील करीत होते. त्याच त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्यांनी केला आहे. तसेच विवाहितेने आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या सूसाईट नोटमध्ये सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहे. ती सुसाईट नोट पोलिसांनी जप्त केली आहे.
आत्महत्येपूर्वी विवाहितेने लिहिलेली सूसाईट नोट !
मीस यू मम्मी-पप्पा…
मी प्रज्ञा चेतन शेळके माझ्यावर अत्याचार झाला आहे, मला माझ लग्न झाल मी कामाला जायची, ज्यावेळेस मी प्रेग्रेट राहीली. त्यावेळेस माझ्या घरच्यांनी मला क्रिटींक करायला सांगितले, तर मी नाही म्हणत होती. त्यांनी मला गावावर आणून मारहाणही केली. मी माझ्या आई-वडीलांना सांगितले तर त्यांनी त्यांचे नातेवाईक जमा केले. माझ्या मावस सासू सासऱ्यांनी मला मारहाण केली. माझे सासू-सासरे व दीर, नवरा मला मारहाण करायला लागले. माझ्या आई-वडीलांसोबत त्यांच्याकडे आली, तर त्यांनी लय टेंशन घेतले. त्यांनी माझ्या लहान मुलीच अस कसकाय झाल अस म्हणून लय टेंशन घेतल होत. त्यांनी ट्रिटमेंट केली तर माझ्या मनाला योग्य नाही वाटल. मी मानसिक तणावामुळे आत्महत्या केली. मला माफ करा मम्मी-पप्पा सॉरी.. असा मजकूर विवाहितेने आत्महत्येपुर्वी लिहीलेल्या सुसाईट नोटमध्ये लिहीला आहे.