
अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील खानदेश शिक्षण मंडळाच्या जी.एस.हायस्कूलचा ८४ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी संचालक नीरज अग्रवाल,प्रदीप अग्रवाल,अनिल शिंदे,शाळेचे चेअरमन योगेश मुंदडे,उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख,माधुरी पाटील,विश्वस्त वसुंधरा लांडगे,संस्थेचे दाते अभिजित भांडारकर,अनिल वैद्य,देणगीदार गिरीश पाटील,सेक्रेटरी ए.बी.जैन,महाविद्यालयाचे प्राचार्य पि.आर.शिरोडे,शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम,मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर,प्राथमिक च्या मुख्याध्यापिका एस.पी. शिसोदे,डी.आर.कन्याशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सी.एस.पाटील,पर्यवेक्षक आर.एल.माळी, बी.एस.पाटील,सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक ए.एस.करस्कर,पर्यवेक्षक व्ही.व्ही.कुळकर्णी,एम.एन.भारती उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन अमित पाटील यांनी केले तर आभार पर्यवेक्षक बी.एस.पाटील यांनी मानले.




















