
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शाहू नगर जवळील जळकी मिल व रेल्वे रुळालगत एकाचा खून झाल्याची घटना भर दिवसा घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील शाहू नगर परिसरात असणार्या जळकी मीलच्या मोकळ्या मैदानाच्या बाजूला एका तरूणाचा रक्तबंबाळ अवस्थेतला मृतदेह आढळून आला. मयत व्यक्ती हा रहीम शहा उर्फ रमा ( वय २५, रा. गेंदालाल मील, जळगाव) हा असल्याची माहिती समोर आली. हे कृत्य दुपारीच कुणी तरी अज्ञात मारेकर्यांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला संपविल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्याने पथक घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड हे पथकासह पोहचले आहेत.दरम्यान, रहीम शहा याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असून दुपारी त्याला तीन तरुणसोबत घेऊन गेले होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.




















