
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शाहू नगर परिसरात असलेल्या जळकी मील जवळील असलेल्या गटारीत एका तरुणाचा मृतदेह सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आढळून आला होता. हा तरुण गेंदालाल मिल मधील रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा (वय-२८) येथील असल्याचे समजते.
मिळालेली माहिती अशी की, गेंदालाल मिल परिसरात राहणारा रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा हा हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होता. रेल्वे ट्रॅकला लागूनच असलेल्या गटारीत रमाचा मृतदेह उलटा पडलेला होता तर जवळच रक्त आणि काही दगड पडलेले होते.
शहर पोलीसानी चक्र फिरविली ; लागलीच संशयिताना घेतले ताब्यात
शहर पोलिसांनी काही तासातच तपास चक्र फिरवून रहीम शहा याचा खून करणाऱ्या तिघांना सीसीटीव्हीच्या आधारे ताब्यात घेतले. पवन किसन लाडे उर्फ देवा (वय १९), मनोज जलाल गायकवाड (वय ४२) व विलास तुकाराम निकम (वय ३४), तिन्ही रा.गेंदालाल) असे तिघांची नावे आहेत. हे तिघेही संशयित हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत रहीम व मारेकरी तिघेही मित्र आहेत. एकाच परिसरात राहतात. रहीम हा शिवीगाळ करून वाद घालत तिघांना मारहाण करायचा व त्यांच्याकडील पैसे हिसकावून घ्यायचा. यामुळे तिघांमध्ये रहीम विषयी राग होता याच रागातून तिघांनी आज कटकारस्थान असून रहीमला सोबत घेत मद्य प्राशन केले व त्यानंतर त्याचा खुन केल्याची माहिती मिळाली आहे. शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तेजस मराठे व योगेश इंधाटे यांना संशयितांची गुप्त माहिती मिळाली होती.




















