
रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील १८ वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा यात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुकयातील कुसुंबा पूजा रविंद्र तायडे ही तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होती. बुधवारी २० जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरातील बाथरूमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. तातडीने तिला रावेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. तरूणीचे वडील रविंद्र मधुकर तायडे यांनी देलेल्या खबरीवरुन रावेर पोलिस ठाण्यात अकास्मत मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरिक्षक दिपाली पाटील पोहेका सतीष सानप तपास करीत आहे.




















