
रावेर : प्रतिनिधी
कशीश प्रॉडक्शन्स आणि पुणेकर प्रतू फाऊंडेशन यांच्या मार्फत दिला जाणारा ग्लोबल आयकॉन ऑफ इंडिया ( सीझन 3 ) हा मानाचा पुरस्कार यंदा डॉ. स्वप्नाली श्रीकांत वाडेकर यांना देण्यात आला.
डॉ. स्वप्नाली वाडेकर या होमिओपॅथी उपचार पद्धतीच्या तज्ञ आणि निष्णात डाॅक्टर आहेत. डॉ. स्वप्नाली वाडेकर यांनी त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा पुरेपूर वापर करून इन्फर्टीलीटी अर्थात वंध्यत्व या आजारावर होमिओपॅथीच्या औषधांनी अनेक दाम्पत्यांवर यशस्वीपणे उपचार केलेत आणि वंध्यत्व असलेल्या दाम्पत्याचे आईवडील होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मोलाची यशस्वी मदत केली. वंध्यत्व असलेल्या दाम्पत्यांच्या जीवनात होमिओपॅथीच्या औषधांनी उपचार करून नैसर्गिक गर्भधारणा घडवून आणून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम डाॅ. स्वप्नाली वाडेकर यांच्या मार्फत गेल्या 15 वर्षांपासून यशस्वीपणे पुणे येथे अविरत सुरू आहे.
त्यांच्या याच निष्णात कार्याची दखल घेऊन कशीश प्रॉडक्शन्स आणि पुणेकर प्रतू फाऊंडेशन यांच्या मार्फत डाॅ. स्वप्नाली श्रीकांत वाडेकर यांना प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या ग्लोबल आयकॉन ऑफ इंडिया हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. १९ जुलै मंगळवार रोजी अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियम, पुणे – सातारा रोड, पुणे येथे हा पुरस्कार वितरण आणि गुण गौरव सोहळा मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत- ख्यातनाम कलाकारांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला. डाॅ. स्वप्नाली वाडेकर यांना जो मानाचा पुरस्कार मिळाला त्याबद्ल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. डॉ. स्वप्नाली वाडेकर या भुसावळ जि.जळगांव येथील श्री. धनंजय लोटू ठाकरे ( Retired Executive Engineer, MSEB ) यांची कन्या आहे.




















