जळगाव मिरर । ११ ऑक्टोबर २०२५
धोबी परीट समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करा, अशी मागणी समाजातर्फे करण्यात आली आहे. धोबी परिट समाजाला पुर्ववत अनुसूचित जातीमध्ये समाविष्ठ करण्यात यावे, धोबी समाज १९६० पूर्वी भंडारा व बुलढाणा जिल्हा अनुसूचित जातीच्या शासकीय आदेशामध्ये आहे. हे पुराव्यानिशी सिध्द झालेले आहे. तरी धोबी परिट समाजाला न्याय देण्यात यावा, डॉ. डी. एम. भांडे समितीच्या शिफारसी राज्य शासनाने तात्काळ लागु कराव्यात, असे निवेदन जळगाव उपजिल्हाधिकारी विजय ढगे यांना देण्यात आले.
यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष अरूण राऊत, प्रदेश सचिव अमर परदेशी, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रभाकर खर्चे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, प्रदेश युवा कार्याध्यक्ष दिपक बाविस्कर, माजी नगरसेवक चेतन शिरसाळे, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, भुषण सोनवणे, महेंद्र सोनवणे, जयंत सोनवणे, दिनकर सोनवणे, प्रशांत मांडोळे, पिंटू बेडीस्कर, कैलास शिरसाळे, जगन्नाथ जाधव, मनोज निंबाळकर, कमलेश लिहनकर, संदिप महाले, संदिप मांडोळे, मनोज वाघ आदी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.