जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२५
स्थानिक निवडणूक येत्या काही दिवसावर येवून ठेपल्या असताना अद्याप महायुती व महाविकास आघाडीची कुठलीही चर्चा नसताना आता शरद पवार गटाच्या खा. सुळे यांनी एक मोठे भाष्य केले आहे. भाजपमध्ये किती लोक मुळ भाजपचे राहिले आहेत. तुम्ही जर विधानसभेत गेलात ना तर आमदारांवर एक नजर टाका त्यांचे काँग्रेसी करण झाले आहे. भाजप विरोधी पक्षात असताना ज्यांनी आंदोलन केले लाठ्या खाल्या, सतरंज्या उचलल्या, ज्यांनी भाजपचा विचारांशी निष्ठावान राहिले ती लोक आज कुठे आहेत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी मी गुरू मानते. जरी आमचे वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी संसदेत अतिशय चांगले काम केले म्हणून मी त्यांना गुरू मानते. मी अनेक वेळा सांगितले की त्यांच्याकडून आम्ही कसे वागायचे हे शिकलो आहोत. जुना भाजपा आणि आजचा भाजप यामध्ये खूप मोठा फरक असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत आहे हे माध्यमांचा आणि सरकारचा डाटा सांगत आहे. पुणे जिल्ह्यात तर गुन्हेगारी घटनांमध्ये सर्वाधिक वाढ होत आहे. यात कोयता गँग, खून प्रकरण, चोरीच्या घटना वाढताना दिसून येत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात रिपोर्ट येतच असतील मग नेमके या घटना का वाढत आहेत हा सवाल मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना विचारावा लागेल,असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्याची आर्थिक परिस्थिती ही अतिशय अडचणीत आहे. भारत सर्वाधिक कर्ज घेणारा देश आहे. राज्यातील मंत्री वारंवार आपल्या खात्याचा निधी वळवला असे सांगतात, कारण सरकारकडे पैसा नाही. ही परिस्थिती चिंताजनक आहे. FRBM ॲक्ट नुसार फिस्कल मॅनेजमेंट 3 ते 4 टक्क्याच्या वर जाऊ नये. पण राज्य सरकारकडून फिस्कल मॅनेजमेंट चुकल्याचे दिसून येत आहे. अजित पवारांनी संग्राम जगतापांना पक्षातून काढून टाकावे नुसती नोटीस देऊन फायदा नाही. जर कोणी समाजात तेढ निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालावा, असे सुळे यांनी म्हटले आहे. सरकारने शेतकऱ्यांकडून पैसे वसुल करू नये हीर काही पैसे वसूल करण्याची वेळ नाही.