जळगाव मिरर | १३ ऑक्टोबर २०२५
जळगाव जिल्ह्यातील महसूल व पोलीस विभागात लाचखोरीच्या अनेक घटना घडत असताना आता भुसावळ येथे वाळू वाहतुकीचे वाहन चालू देण्यासह कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 73 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना भुसावळ तहसील कार्यालयातील तलाठी, कोतवाल व खाजगी पंटराला जळगाव एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई सोमवार, 13 रोजी दुपारी करण्यात आल्याने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितनुसार, वराडसीम तलाठी नितीन केले यांच्यासह अन्य तिघांचा अटकेतील संशयीतांचा समावेश असून हि धडक कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला. जिल्ह्यात वाळू वाहतूक बंद असलीतरी वरिष्ठांच्या आदेशाने बिनदिक्कतपणे वाळू सुरू आहे. त्यातच वाळू वाहतुकीच्या डंपरवर कारवाई न करण्यासाठी व वाळू वाहतूक सुरू राहू देण्यासाठी 73 हजारांची लाच मागण्यात आली होती.