
वरणगाव : प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील पिप्रीसेकम येथील एकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
तालूक्यातील पिंप्रीसेकम येथील रहिवाशी असलेल्या धनराज डिंगबर तायडे ( ४३ ) हे दिपनगर येथे औष्णीक विज केंद्रात मजुरीचे काम करीत होते दि २१ गुरुवार रोजीच्या दुपारी बारा वाजेच्या सुमारास बाहेरून येऊन आपल्या राहत्या घराच्या आतल्या खोलीत जाऊन दरवाजा आतून बंद करीत घरातील छताच्या हुकाला दोरी बाधुन गळ्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्याला घरातील इतर लोकानी आवाज दिला मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडल्या नतंर लक्षात आल.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला निखिल तायडे याच्या खबरीवरून अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे
मयत धनराज यांच्या पश्चात पत्नी , दोन मूली , एक मुलगा , आई वडिल असा परिवार आहे




















