जळगाव मिरर । २ नोव्हेंबर २०२५
गेल्या काही महिन्यापासून सोन्यासाह चांदीचे दर गगनाला भिडत असताना आता जळगाव शहरातील एका बड्या सोन्याच्या दुकानातून एका महिलेने चक्क लाखों रुपयांची सोन्याची अंगठी चोरी केल्याची घटना घडली आहे. शहरातील रिंगरोडवरील पु. ना. गाडगीळ अँड सन्स लि. या दागिन्यांच्या दुकानातून एका महिलेने १ लाख ४० हजार रुपयांची सोन्याची अंगठी चोरल्याचा प्रकार ३० रोजी समोर आला. याप्रकरणी शनिवारी जिल्हापेठ पोलिस ठा गुन्हा दाखल आहे.
सविस्तर वरुत असे की , याबाबत मॅनेजर गिरिष दिवाकर डेरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंगठी काउंटरवर काम करणाऱ्या सीमा सुर्वे यांनी ग्राहकांना अंगठ्या दाखविताना एक अंगठी डुप्लिकेट असल्याचे लक्षात आणून दिले. सर्व अंगठ्यांचे बारकोड तपासल्यानंतर १०.७३० ग्रॅम वजनाची एक अंगठी चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी एक महिला अंगठ्या पाहत असताना खोटी अंगठी ठेवून खरी सोन्याची अंगठी घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसून आले. या अंगठीचे वजन १०.७३० ग्रॅम असून, किंमत १ लाख ४० हजार रुपये आहे.



















