
पारोळा : प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील हिवरखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
विप्रो कंपनीचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण अझीमजी प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित दिनांक 24 रविवार रोजी विप्रो कंपनीचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण अझीमजी प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या जि प शाळा हिवरखेडे बु येथील शाळेतील 32 आदिवासी बालकांना सुनील राजाराम चौधरी अमळनेर यांच्याकडून मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी .सुनील माहेश्वरी अमळनेर ,श्री.महेंद्र भाऊ जैन अमळनेर, सुरेश पाटील सर उपशिक्षक भिलाली माध्यमिक, मुख्याध्यापक दगडू पाटील उपशिक्षक .ईश्वर धोबी यांचे सहकार्य लाभले.




















