जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२५
महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत नाशिक जिल्हा बॉक्सिंग संघटनेची महत्वाची बैठक रवींद्रनाथ टागोर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नाशिक येथे उत्साहात पार पडली.या बैठकीस राज्य बॉक्सिंग संघटनेचे खजिनदार ॲड. मनोज पिंगळे, नाशिक विभागीय सचिव मयूर बोरसे, RJ कमिशनचे चेअरमन कॅप्टन सुरेश कदम, राज्य पंच व प्रशिक्षक कार्लोस थॉमस, मेजर सैनिक व राष्ट्रीय खेळाडू बी. टी. तुपे, मेजत सैनिक बि. डी. पाटिल, सैनिक इम्तियाज शेख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका प्रतिनिधी कळवणचे अक्षय सूडवारकर, सटाण्याच्या सायली अहिरे, सिन्नरचे सुदर्शन सानप, कैलास ताठे, इगतपुरीचे हिरा बुलाखे, त्र्यंबकेश्वरचे मुकेश पाटील साहिल गंगुर्डे आणि दिंडोरीचे राजेंद्र बेलोटे मालेगाव मागेश मगर, मुस्ताफा शैख नांदगावं दयाराम राठोड चंवादवड प्रतिक खैणार — तसेच जिल्ह्यातील प्रशिक्षक,भुषण आहोल, मिलिंद जाधव, तौफिका शेख,शेखर पाटोले क्रीडाशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील बॉक्सिंगचा विकास, खेळाडू संख्या वाढ, प्रशिक्षण सुविधा, नवीन कॅम्प, प्रचार-प्रसार, तसेच येणाऱ्या स्पर्धांमध्ये अधिकाधिक खेळाडूंना संधी देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी प्रत्येक तालुका प्रतिनिधी, प्रशिक्षक, क्रीडाशिक्षक आणि पालक यांनी आपल्या-आपल्या तालुक्यातील येणाऱ्या अडचणी, सुविधा अभाव, आर्थिक मर्यादा, मैदान–क्लब–प्रशिक्षण साहित्य यासंबंधी समस्या मांडल्या. त्या सर्व अडचणी गांभीर्याने ऐकत, लवकरच त्या दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील असे आश्वासन खजिनदार ॲड. मनोज पिंगळे यांनी दिले. त्यांनी जिल्हास्तरीय बॉक्सिंग संरचना अधिक बळकट करण्यासाठी समन्वय यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला.
राज्य अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटनांना बळकटी देण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचा उल्लेख विभागीय सचिव मयूर बोरसे यांनी केला. ग्रामीण पातळीवर बॉक्सिंगची सशक्त चळवळ उभी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच ॲड. मनोज पिंगळे यांच्या खजिनदार पदाच्या बिनविरोध निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
नाशिकची ओळख ‘मिनी महाराष्ट्र’ म्हणून अधोरेखित करताना, सुरगाणा–पेठ–इगतपुरीचे कोकणासारखे हवामान, पंचवटीचे पौराणिक महत्त्व आणि ऐतिहासिक जनस्थान–त्रिकंटक–गुलशनाबाद यांचा उल्लेख करण्यात आला.
याच अनुकूलतेमुळे नाशिक विभागीय बॉक्सिंगचा केंद्रबिंदू ठरणार असून, शासन, एमआयडीसी उद्योजक आणि विविध संस्थांकडून CSR फंड व स्पॉन्सरशिपद्वारे भरघोस निधी उपलब्ध करून देणार
— ॲड. मनोज पिंगळे
नाशिक जिल्ह्यात अधिकृत राज्य पंचांची संख्या ५० पर्यंत वाढवण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली यामुळे पंचविकासाला नवे बळ मिळून स्पर्धा व्यवस्थापन अधिक सक्षम होईल, असे नमूद केले.
— कॅप्टन सुरेश कदम, चेअरमन RJ कमिशन, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना,
नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या चार जिल्ह्यांच्या एकत्र सहभागातून दरवर्षी भव्य आणि प्रतिष्ठेची नाशिक विभागीय फिरता चषक बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करणार
— मयूर बोरसे, नाशिक विभागीय सचिव
ही संपूर्ण बैठक नाशिक विभागीय सचिव मयूर बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध व कार्यक्षमतेने पार पडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्लोस थॉमस यांनी केले, तर आभारप्रदर्शन माजी सैनिक बी. टी. तुपे यांनी मानले.




















