
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील सुप्रिम कॉलनी येथे कौटुंबिक वादावरून तरूणासह त्याची मामी व मावशी यांना तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी २४ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन भरत महाले (वय २४, रा. अयोध्या नगर, जळगाव) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. नितीनची मामी मोना बाळा पाटील आणि मावशी रूपाली सुरेश पाटील हे दोघे सुप्रिम कॉलनीत राहतात. शनिवारी २३ जुलै रेाजी रात्री ११ वाजता नितीन हा सुप्रिम कॉलनीतील गजानन महाराज मंदीराजवळ उभा असतांना सुरेश चुडामण पाटील रा. गजानन महाराज मंदीर जवळ, सुप्रिम कॉलनी याने घरघुती वादाच्या कारणावरून नितीन महाले याच्या पोटावर तिक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केले.
ही घटना घडली असतांना नितीची मामी मोना आणि मावशी रूपाली या धावून आल्या असता त्यांनी देखील तिक्ष्ण हत्याराने वार करून शिवीगाळ केली. या घटनेप्रकरणी नितीन महाले याने रविवारी २४ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुरेश चुडामण पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहे.




















