जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२५
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव तर्फे मु.जे. महाविद्यालयातील शिष्यवृत्तीविषयक विद्यार्थी तसेच पालक यांच्या विविध समस्या आज प्राचार्यांसमोर मांडण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून शिष्यवृत्ती पोर्टलवरील अडचणी, कागदपत्रांची पडताळणी, महाविद्यालय-स्तरावरील विलंबित प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांना वेळेत लाभ न मिळाल्याबाबत अनेक तक्रारी परिषदेकडे आलल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर अभाविपच्या प्रतिनिधीमंडळाने प्राचार्यांना भेट देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी केली. शिष्यवृत्ती ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सुविधा असून त्यात होणारा विलंब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम करतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
प्राचार्यांनी उपस्थित समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित विभागांना त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी महानगर विस्तारक ऋषिकेशजी केकाण, महानगर सहमंत्री वरद पांढरकर, महाविद्यालय मंत्री लोकेश वाघ तसेच अ.भा.वि.प. इतर विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.




















