जळगाव मिरर । २२ डिसेंबर २०२५
शनिवार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी संत श्री गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त संभाजी नगर येथील संत श्री गाडगेबाबा चौकात माल्यार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संत श्री गाडगेबाबा युवा फाउंडेशन तसेच संत श्री गाडगेबाबा चौक मित्र मंडळ यांच्या संयुक्त मानाने हा कार्यक्रम संपन्न झाला. आमदार सुरेश (राजूमामा) दामू भोळे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आ. सुरेश भोळे यांनी संत गाडगेबाबा यांच्या सामाजिक कार्याचा, स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि समाजप्रबोधनाचा वारसा आजच्या पिढीने आत्मसात करण्याचे आवाहन केले. संत गाडगेबाबा यांचे विचार आजही समाजासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास परीट सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. सुरेश ठाकरे, पीएसआय सुरळकर, माजी नगरसेवक चेतन नारायण शिरसाळे यांच्यासह दीपक बाविस्कर, दिलीप सपकाळे, जयंत सोनावणे, नितीन सपके, राजेंद्र मगन सोनावणे, प्रशांत मांडोळे, विजय शेवाळे, दिलीपदादा शेवाळे, मनोज निंबाळकर, सुनील खरचे, प्रभाकर खरचे, चंद्रकांत वाघ, गणेश सपके, सागर सपके, सागर बाविस्कर, विवेक खरचे, संकेत कापसे, कुणाल खरचे, यश खरचे, जगन्नाथ जाधव, किशोर सपके, दीपक पवार, सुरेश महाले, कैलास जाधव, रविंद्र सोनवणे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांततामय वातावरणात पार पडला असून संत गाडगेबाबा यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.




















